नगरसेवकानं शिवीगाळ करत केली महिला तलाठ्यांना मारहाण
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
5 Jun :- तहसिलदार नियुक्त वाळु तपासणी पथकातील महिला तलाठींना मारहान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पथकातील निशा पावरा या महिला तलाठी यांना नगरसेवक गौरव चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली आहे. याप्रकरणी भाजप नगरसेवक गौरव चौधरींच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्यासह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव चौधरी यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाकडे गुजरातमधून महाराष्ट्रात वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. यामुळे तपासणी पथकाने दोन तास वाळू वाहतुक करणारा ट्रक अडवला. यानंतर ट्रकच्या ड्रायव्हरने ट्रक पळवण्याचा प्रयत्न केला असता, निशा पावरा यांच्यासह अन्य दोन महिला तलाठ्यांनी तहसिलदार यांच्या वाहनातून पाठलाग करुन ट्रक अडवला. या सर्व प्रकारानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या नगरसेवक गौरव चौधरी आणि पथकातील महिला तलाठ्यात वाद झाला. यावेळी नगरसेवक गौरव चौधरी यांनी महिला तलाठ्यासोबत शिवीगाळ करत त्यांना धक्काबुकी करुन मारहान केली. यानंतर संतप्त तलाठींसह महसुलच्या सर्व अधिकारी यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात ठाण मांडुन याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर, दुसरीकडे नगरसेवक गौरव चौधरी यांनी या पथकावर वाळू ट्रक अडवून पैशांची मागणी केल्याचा आरोप लावला.
आपण कोणालाही मारझोड केली नसून संबंधीत महिला तलाठी पाय अडकुन खाली पडल्याचा त्यांना दावा चौधरी यांनी केला आहे. त्यांच्या वाहनाच्या चालकांनी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर या पथकातील अन्य महिला तलाठी प्रचंड तणावात असुन याप्रकरणी न्यायाची मागणी त्यांनी केली आहे.