News

शहरातील एकाचे स्वॅब घेतले तर दोघांना केले क्वारंटाईन.


किल्लेधारूर (प्रतिनिधी) शहरातील एका व्यक्तीत आढळून आलेल्या लक्षणानंतर त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला असून बीड प्रकरणात शहरातील दोघांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
कोरोना बाबतीत प्रशासन अत्यंत सतर्क झाले असून जिल्ह्यात आढळून आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्व गावे सिल केली आहेत. आज किल्लेधारुर शहरात एका व्यक्तीला त्रास होत असल्याने त्यास स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सदरील रुग्णात आढळून आलेल्या लक्षणामुळे त्याच्या नाक व घशातील नमुने तपासणीसाठी घेण्यात आली आहेत. सदरील स्वॅब लातुर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. दरम्यान काल बीडमध्ये सर्वत्र फिरलेल्या पॉझिटीव्ह रुग्णामुळे किल्लेधारुर शहरातही दोघांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.