महाराष्ट्र

‘या’ दिवशी होणार महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 Jun :- मान्सूनचे काही दिवसापूर्वी केरळ राज्यांत आगमन झाले होते. आता केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हजेरी लावत मान्सून कर्नाटक राज्यात दाखल झाले आहे. त्यामुळे दक्षिण आणि उत्तर कर्नाटकसह तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातही पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासांत या राज्यांमध्ये पावसाने अधूनमधून हजेरी लावली आहे. हवामान खात्याने येत्या 12 तासांत या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, मान्सून 10 जून रोजी महाराष्ट्र राज्यात दाखल होणार आहे. त्यासोबतच मध्यप्रदेश 20 जून तर राजस्थानमध्ये 25 जूनला पोहचणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात आलेल्या तौक्ते आणि यास चक्रीवादळांमुळे नौतापा आणि ‘लू’चा प्रभाव अनेक राज्यांत पाहायला मिळाला नाही. दिल्लीत हा पहिलाच उन्हाळा आहे, ज्यामध्ये उष्णतेच्या लाटा पाहायला मिळाले नसल्याचे आयएमडीने सांगितले. त्यामुळे दिल्लीत येत्या काही दिवसांत पाऊस सुरु होऊ शकतो.