अज्ञात आरोपीने 20 लाख रुपयांची बॅग पळवली
अंबाजोगाई येथील न्यायालया समोरून अज्ञात आरोपीने 20 लाख रुपयांची बॅग पळवली,
घटने बाबत पोलीस साशंक
अंबाजोगाई येथील रहिवासी असलेल्या व पुणे येथे वास्तव्यास असलेल्या एका बिल्डरने शहरातील बाजार पेठ मधील एका दुकानाच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी आपल्याच भावाकडे पाठवलेली तब्बल 20 लाख रुपयांची रक्कम त्या भावाने तीन दिवसा पूर्वी येथील एका कापड विक्रेत्या कडे ठेवली सदर रक्कम असलेली बॅग त्या व्यापाऱ्याने आज सकाळी तक्रारदार बालाजी हरिभाऊ गोरे यांच्या कडे सुपूर्त केली. तक्रारदार ही बॅग घेऊन स्कुतीवरून कोर्टा कडे गेला व बॅग स्कुटीला लटकावून तो येथील जिल्हा व सत्र न्यायालयात कोर्ट तिकीट घेण्यासाठी गेला अज्ञात आरोपीने ही 20 लाख रुपयांची बॅग लंपास केल्याचे म्हंटले असुन एवढी मोठी रक्कम असलेली बॅग स्कुटीला लावून कसा गेला या विषयी पोलीस साशंक आसुन पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे हे कसून तपास करत आहेत.