सिनेमा,मनोरंजन

‘तारक मेहता’ मालिकेमध्ये नव्या दयाची होणार एन्ट्री?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Jun :- तारक मेहता का उलटा चष्मा या धम्माल विनोदी मालिकेतील दया बेन हे लोकप्रिय पात्र गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेमध्ये दिसत नसल्याने मालिकेतील रसरशीतपणा निघून गेल्यागत वाटू लागला आहे. या शो चे निर्माता असित मोदी शोमधील मसाला कंटेंट वाढविण्यासाठी शोमध्ये नवीन अभिनेत्री आणणार आहे. एका अहवालानुसार ‘परमवतार श्रीकृष्ण’ अभिनेत्री सोनी पटेल, तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये एन्ट्री मारणार आहे.

बातमीनुसार अभिनेत्रीच्या एन्ट्रीबरोबरच या कार्यक्रमात एक अतिशय रोमांचक ट्विस्ट येईल. अशा परिस्थितीत तारक मेहता शोमध्ये सोनी पटेलची एन्ट्री शोच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची मानली जात आहे. मात्र, अभिनेत्री सोनी पटेलने तिच्या एन्ट्रीवर सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच तीने याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. पण सोनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे.

सोनीच्या पोस्टमध्ये तारक मेहता चे जेठालाल म्हणजे दिलीप जोशी दिसत आहे. सोनीने दिलीप जोशीसोबत स्वत: चे एक चित्र शेअर केले आहे. सोशल मीडियावरील चाहते अजूनही असाच प्रश्न विचारत आहेेत की तारक मेहता मद्ये दया बेनची रीएंट्री कधीपर्यंत होईल? या प्रश्नच उतत निर्माते असित मोदीच देऊ शकतात. मात्र अद्याप असित मोदींनी कुठलेलंही उत्तर दिलेले नाही.