बीड

अन्यथा बीडमध्ये कडक लॉकडाऊन!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Jun :- बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख घसरणीला लागल्याने १ जून पासून लॉकडाऊन मधील कडक निर्बंध काहीशी शिथिल करण्यात आले आहेत. परंतु, बीड जिल्ह्यातील नागरिक काही नियम शिथिल होताच गुरा-ढोरांप्रमाणे रस्त्यावर सर्वत्र फिरु लागली आहेत. कोरोना विषयक नियम न पाळता लोकांची जत्ते सध्या पाहावयास मिळत आहेत. यामुळे बीड जिल्ह्यात घसरणीला लागलेला कोरोनाचा आलेख पुन्हा एकदा उंचावण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी अशाच प्रकारे कोरोना विषयक नियमांची पायमल्ली केल्यास पुन्हा एकदा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा इशारा बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी म्हणाले की, लॉकडाऊन शिथील केल्यानंतर विनाकारण नागरिक रस्त्यावर व शासकीय कार्यालयात दिसून येतात ही गंभीर बाब आहे.

जिल्ह्यात दरदिवशी रुग्णसंख्या कमी येत असली तरी गर्दी केल्यास पुन्हा कोरोनाचे संक्रमण वाढू शकते. त्यामुळे पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ शकते किंवा कडक लॉकडाऊन लागू केला जाईल. नागरीकांच्या बेशिस्त वागणुकीचा त्रास सर्व समाजास होऊ शकतो. सर्व लोकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे व कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे.