महाराष्ट्र

शिवसैनिकांनी अडवला फडणवीसांचा ताफा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Jun :- विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर असून यावेळी शिवसैनिकांकडून त्यांचा ताफा अडवण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने थैमान घातलं होतं. यात केळी बागांसह घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी शिवसैनिकांनी फडणवीसांचा ताफा अडवला.

परिवर्तन चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ताफा अडवत शेतकऱ्यांच्या केळी पीक विमाबाबत जाब विचारला. एकनाथ खडसे अनेक वर्ष भाजपाचे आमदार असतानाही कोणती विकासकामं केली नसल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. फडणवीसांसोबत यावेळी गिरीश महाजनदेखील उपस्थित होते.