बीड

जिल्हावासियांना दिलासा! बीड जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांचा नवा आदेश

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 May :- बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी जवळपास गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून बीड जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र सद्य स्थितीत बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा कहर आटोक्यात येत असल्याने बीड जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी नवे आदेश काढले आहेत.

सदरचे आदेश हे 1 जून ते 15 जून या कालावधीपर्यंत आहेत. बीड जिल्ह्याला उद्या 1 जूनपासून काहीश्या प्रमाणात सवलत देण्यात येत असून मेडिकल, रुग्णालय, पेट्रोल पंप, टपाल सेवा सह अन्य अत्यावश्यक सेवेमधील आस्थापने उद्यापासून पुर्णवेळ सुरू राहणार आहे तर किराणा, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण, बेकरीची दुकाने सकाळी सात ते सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान उघडता येणार आहेत. मात्र शनिवार आणि रविवारी ही आस्थापने पुर्णत: बंद ठेवली जाणार आहे.

जिल्ह्यातील दारू दुकाने पूर्णपणे बंद राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सर्व औषधालय, दवाखाने, निदान क्लिनिक, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकी, आरोग्य सेवा ज्यात सहायक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतूक, पुरवठा साखळी – लसीचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय उपकरणे, कच्चामाल, पेट्रोल पंप, पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत उघड्या राहणार आहेत. दूध विक्री केवळ सकाळी सात ते 10 या वेळेतच करता येणार आहे.

सकाळी 7 ते 11 या वेळेत काय उघडे

-अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणाऱ्या आस्थापना, किराणा दुकान, भाजीपाला, चिकन, मटन, बेकरी या सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेत चालू करता येणार आहेत. या आस्थापना शनिवार आणि रविवारी पुर्णपणे बंद राहतील.
-गॅस वितरण दिवसभर सुरू
-शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे 25 टक्के उपस्थितीत सुरू राहतील. ओळखपत्र असणे बंधनकारक
• लसीकरणकरिता 45 वर्षावरील ज्या व्यक्तींना मॅसेज आला आहे अथवा आरोग्य विभागाचे पत्र आहे अशांना ओळखपत्रासह लस घेण्यासाठी बाहेर जाण्यास मुभा.
सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत काय सुरू ?,
• कृषी व्यवसाय संबंधी बी-बीयाणे, खते, औषधे यांची दुकाने व त्या दुकान मालकास आलेले बी-बीयाणे, खते, औषधे केवळ गोडावून किंवा दुकानामध्ये उतरून घेण्यास मुभा तसेच कृषी विक्रेत्यांना शेतकऱ्यांना बी-बीयाणे, खते, औषधँ विक्री व खरेदीस सकाळी 7 ते. दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी असेल. शनिवार रविवार सुध्दा हे दुकाने
यावेळेत सुरू राहतील.
कृषी उत्पन्न बाजार समित्या सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत सुरू राहतील.
• जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना सकाळी 7 ते दुपारी 2
यावेळेत लाभार्थ्यांना धान्य वितरण करता येईल.. – जिल्ह्यातील सर्व प्रकारचे मद्य विक्री पूर्णपणे बंद राहूतील. दुकानांना पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तूच्या वाहतूकीवर निर्बंध असणार नाहीत परंतू दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. नियमाचा भंग केल्यास कायदेशीर केली जाईल.