राजकारण

अजितदादा, जरा सांभाळून बोला अन्यथा…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 May :- अजितदादा सांभाळून बोला आम्ही फाटकी माणसं आहोत, आम्ही बोलायला लागलो तर महागात पडेल, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. तसेच खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी मवाळ भूमिका घेऊ नये, सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण मिळवून घ्यावं, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, “आता मी उभ्या-उभ्या जास्त बोलत नाही, झोपेत सरकार कोणी आणलं? तुम्ही आणलं, शरद पवार साहेबही झोपेतून उठायचे होते. तोपर्यंत तुम्ही शपथविधी करुन मोकळे झालात. त्यामुळे झोपेत कसं सरकार आणायचं, हे तुम्हाला माहीत आहे.

मी आपलं उपरोधिकपणे म्हणालो. मला असं वाटत होतं की, अजित पवारांसारखे भरपूर वर्ष राजकारणात असलेले नेते यांना आपण काल काय केलं याची आठवण असेल. पण त्यांना बहुतेक आपण काल काय केलंय याची आठवण नाही. ज्यांच्या मांडीला मांडी लावून तीन दिवसांसाठी का होईना सरकार केलं, त्यांच्यावर टीका करताना काहीतरी विचार करा.”

“देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना तलवारीचा धाक दाखवून शपथविधीसाठी नेलं नव्हतं. विचारपूर्वक केलं ना. तुम्हाला तुमचे 28 आमदार बरोबर आणले ते ठेवता आले नाहीत. सगळे शरद पवारांकडे पळून गेले. त्यानंतर तुम्ही महाविकास आघाडीतही उपमुख्यमंत्री आणि फडणवीसांसोबत स्थापन केलेल्या सरकारमध्येही उपमुख्यमंत्रीच. आता माहीत नाही उद्या पुन्हा नवं सरकार स्थापन होईल, त्यातही तुम्हीच उपमुख्यमंत्री असाल, तुम्ही मात्र सगळीकडे पाहिजे. तत्व नाही, व्यवहार नाही, कशाची कशाला सांगड नाही. ज्याचं सरकार त्याच्यासोबत मी जाणार, हे एकच तत्व. अजितदादा… जरा सांभाळून बोला, आम्ही फाटके आहोत, आम्ही बोलायला लागलो तर महागात पडेल.” “मराठा आरक्षण लगेच मिळण्यासाठी, मराठा आरक्षण सवलती सुरु करण्यासाठी, जो-जो संघर्ष करेल त्याच्यासोबत आम्ही आहोत, हे आम्ही दहा वेळा सांगितलं आहे.

संभाजीराजे तर आमचे राजे आहेत. पण राजे असं म्हणाले की, आरक्षण मिळालं पाहिजे पण संघर्ष न करता मिळालं पाहिजे. मिळालं पाहिजे पण कोविड संपल्यानंतर बघुयात, त्यांची ही भूमिका आम्हाला मान्य नाही. कोविडचा काय संबंध? सगळं जनजीवन सुरु आहे. भ्रष्टाचार सुरु आहे. दोन हातांनी खाणं सुरु आहे. मग काय मराठा समाजानं कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर येईपर्यंत थांबायचं का? बाती आम्हाला मान्य आहे.”, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.