महाराष्ट्र

मुख्यमंत्री आज रात्री साधणार जनतेशी संवाद; लॉकडाऊनची घोषणा करतील का?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 May :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री आज रात्री 8.30 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. त्यामुळे आज मुख्यमंत्री नेमकं कोणत्या मुद्द्यावर बोलतील याची उत्सुकता सर्वांना आहे. लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करतील का? लॉकडाऊन उठवण्याची घोषणा करतील का? जिल्हाबंदी उठवतील का? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे रात्री 8.30 ला मिळतील.

मुख्यमंत्री लॉकडाऊन बाबत महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन वाढणार हे जवळपास निश्चित आहे, मात्र ज्या भागात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे तिथे शिथिलता दिली जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवला तरी तो कशा प्रकारे असेल याची घोषणा मुख्यमंत्री करु शकतील.राज्यातील व्यापारी संघटनेने 1 जूनपासून व्यापार, दुकाने सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्याबद्दल काय निर्णय घेतील, याकडेही व्यापाऱ्यांचे लक्ष आहे.

दुकाने, व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. यामुळेचे येत्या 1 जूनपासून सर्व प्रकारचा व्यापार सुरु झालाच पाहिजे अशी मागणी ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ चे राष्ट्रीय संगठन मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली होती.