महाराष्ट्र

15 वर्षीय मुलावर ‘अनैसर्गिक अत्याचार’ करणारा नराधम अटक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 May :- गेल्या वर्षभरापासून एक नराधम एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करत होता. त्याच्या शरीरावर सिगारेटचे चटके देत होता. अखेर या मुलाने याबाबत आपल्या आईला सांगितले. जाब विचारण्यास गेलेल्या आईला देखील या नराधमाने मारहाण केली. या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी सुरज उर्फ सदाशिव सावरे या नराधमाला अटक केली आहे. आरोपी सुरज हा रिक्षाचालक आहे.

सदर पीडित अल्पवयीन मुलगा आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत राहतो दोन दिवसापासून तो घरी परतला नव्हता. या मुलाची आई त्याचा शोध घेत होती. मात्र दोन दिवसांनी हा मुलगा घरी परतला. त्याच्या आईने मुलाकडे विचारपूस केली, घाबरलेल्या मुलाने आपल्या सोबत घडलेल्या घडलेल्या प्रकार आईला सांगितला. आपल्या मुलासोबत घडलेला प्रकार ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली.

पोलिसांच्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व परिसरात राहणारा सुरज उर्फ सदाशिव सावरे याने या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला असल्याची तक्रार आहे. गेल्या वर्षभरापासून तो हे कृत्य करत होता. दोन दिवसांपासून त्याने या मुलाला एका खोलीत कोंडून ठेवले होते. त्या ठिकाणी त्याला सिगारेटचे चटके सुद्धा दिले. आपल्या मुलावर झालेल्या अत्याचाराचा जाब विचारण्यास गेलेल्या आईला देखील सदाशिवने मारहाण केली. पीडित मुलाच्या आईने तात्काळ डोंबिवली पोलीस स्थानकात धाव घेत सुरज विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी सदाशिव शावरेला अटक केली आहे.