पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; मुलांना देणार मोफत शिक्षण आणि इतर सुविधा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
29 May :- कोरोना महामारीत अनेक मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवले आहे. अशा मुलांसाठी मध्य प्रदेश, महाराष्ट्र राज्यांनी योजना जाहीर केल्या आहेत. आता केंद्र सरकारनेही या मुलांसाठी पुढाकार घेतला आहे. कोविड काळात दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांना ‘पीएम-केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. अशा मुलांचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मासिक वेतन मिळणार आहे. तर 23 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
कोविडमुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी विनामूल्य शिक्षण दिले जाणार आहे. तसेच मुलांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यात मदत केली जाणार असून अशा कर्जावरील व्याज पंतप्रधान मदत निधीतून दिले जाणार आहे. अशा मुलांचा 18 वर्षांपर्यंत 5 लाखांचा आरोग्य विमा आयुष्मान भारत अंतर्गत काढण्यात येणार आहे. या विम्याचा हप्ता पीएम केअरद्वारे भरला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान कार्यलयातून केली आहे.कोविड काळात दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावे 5 लाख रुपये मुदत ठेव ठेवून त्यावर येणारे व्याज त्यांना मिळत रहावे. एक पालक गमावलेल्या बालकांना ‘बाल संगोपन’ योजनेत समाविष्ट करत दरमहा 2500 रुपये मदत मंजूर करावी अशी मागणी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक असून लवकरच कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येईल, अश्या यशोमती ठाकूर म्हणाल्या. याआधी मध्य प्रदेश सरकारने या मुलांना अशा पद्धतीने मदत करण्याचा निर्णय घेतला होता. सद्यस्थितीत कोरोनाचा विषाणूचा वाढलेला संसर्ग आणि त्यामुळे कोवीड-19 बाधीत व्यक्तींचे व मृत्युचे वाढलेले प्रमाण विचारात घेता, त्याचा बालकांच्या जीवनावर देखील गंभीर परिणाम होत आहे. काही प्रसंगी कोवीड-19 या रोगामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त आहे.