बीड

बीड जिल्ह्यात वाढला ‘म्युकरमायकोसिस’ चा धोका

29 May :- करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच बीड जिल्ह्यात आता म्युकरमायकोसिसचाही धोका वाढत आहे. या आजाराची आतापर्यंत ७४ रुग्णांना लागण झाल्याचे समोर आले. या रुग्णांवर बीडच्या शासकीयसह, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वेळीच निदान व योग्य उपचारामुळे अकरा जणांनी म्युकरमायकोसिसवर मात केली आहे. काही रुग्णांवर शस्त्रक्रियाकरण्यात आल्या असून सध्या ५५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.करोना विषाणू संसर्गाची बाधा झाल्यानंतर त्यावर मात करून मृत्यूला परतवणारे आठ रुग्ण करोनापश्चात म्युकरमायकोसिसचे बळी ठरले आहेत.