बीड

कोविड सेंटरमधील नर्सचा विनयभंग

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 May :- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमधील एका नर्सला सोबत काम करणाऱ्या अर्जुन अनंत फड या ब्रदरने दीड महिन्यापासून सतत पाठलाग करून त्रास दिला. त्यानंतर मंगळवारी २५ मे रोजी रात्री घरात घुसून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून त्या ब्रदरवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

याप्रकरणी पीडितेच्या आरोपावरून अर्जुन फड याच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास फौजदार मोनाली पवार या करत आहेत. दरम्यान आरोपी फरार झाला असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.