तरच राज्यातील लॉकडाऊन उठू शकतो
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
25 May :- 50 टक्के नागरिकांचं लसीकरण झालं तरच लॉकडाऊन उठू शकतो, असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे. लॉकडाऊन एकदम उघडला जाणार नाही, परंतु सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा विचार नक्की करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं आहे. कॅबिनेट बैठकीत याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. हॉटेल, सलून व्यावसायिक, इलेक्ट्रिक दुकानांना दिलासा देण्याचा निर्णय टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री घेतील असंही अस्लम शेख म्हणाले आहेत.
अस्लम शेख बोलताना म्हणाले की, “जोपर्यंत मुंबई शहर आणि महाराष्ट्रात 50 टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत लॉकडाऊनमध्ये कोणताही दिलासा देणं हे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊनमध्ये कसा दिलासा देता येईल, काय नियम असतील, कोणत्या दुकानांना परवानगी देता येईल याचा विचार सुरु आहे. टास्क फोर्स याबाबत सूचना करतील. त्यानंतर कॅबिनेटमध्ये योग्य तो निर्णय घेऊन, यासंदर्भात घोषणा केली जाईल.”