भारत

अन्यथा बाबा रामदेव यांच्यावर 1 हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 May :- उत्तराखंड ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’नं योगगुरू बाबा रामदेव यांना १००० कोटींची मानहानीची नोटीस धाडलीय. रामदेव यांनी ‘अॅलोपॅथी’ संदर्भात केलेल्या वक्तव्यांवरून आयएमए नाराज आहे. येत्या १५ दिवसांत योगगुरु रामदेव यांनी लेखी माफी मागवी तसंच व्हायरल झालेल्या वक्तव्यांबद्दल प्रतिवाद करणारा व्हिडिओ पोस्ट करावा, अशी मागणी आयएमएकडून करण्यात आलीय. रामदेव यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर १००० कोटींचा दावा दाखल केला जाईल, असंही आयएमएनं म्हटलंय.

सोबतच ही नोटीस मिळाल्यानंतर ७६ तासांच्या आत करोनावर रामबाण उपाय म्हणून प्रचार केल्या जाणाऱ्या ‘कोरोनिल’च्या सगळ्या भ्रम निर्माण करणाऱ्या जाहिराती सगळ्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात याव्यात, अशीही मागणी आयएमएनंत केलीय. रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आणि कारवाईसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही आयएमएनं म्हटलंय. याअगोदर, अॅलोपॅथी उपचार हा मूर्खपणा आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे.

अॅलोपॅथीमुळे अनेकांनी जीव गमावले, असं म्हणताना बाबा रामदेव यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर देशभरातील डॉक्टरांनी टीका केली होती. या प्रकरणात आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रामदेव यांना आपलं वक्तव्य मागे घेण्याचा सल्ला देण्यात आल्यानंतर रामदेव यांनी आपल्या व्हायरल झालेल्या वक्तव्यावर शरणागती पत्करत ‘भावना दुखावल्या असतील तर खेद’ व्यक्त करत वक्तव्य मागे घेत असल्याचं जाहीर केलं होतं. तर ‘आपलं वक्तव्य माघारी घेत रामदेव यांनी आपल्या परिपक्वतेचं उदाहरण दिल्याचं’ सांगत आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही या प्रकरणात सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.