बीड

बीड कोरोना ब्रेकींग; बाधितांच्या संख्येत दिलासादायक घसरण

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 May :- बीड जिल्ह्यात कोरोनोची दुसरी लाट ओसरत असल्याचं पहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील रिकव्हरी रेटही दिवसेंदिवस वाढत आहे.


बीड आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 5501 कोरोना अहवालात जिल्ह्यात 703 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 64 रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात बाधितांमध्ये अंबाजोगाई 42, आष्टी 92, बीड 226, धारूर 25, गेवराई 66, केज 64, माजलगाव 30, परळी 15, पाटोदा 46, शिरूर 63, वडवणी 33 असे रुग्ण आढळून आले आहेत.