बीडचे भूमिपुत्र किशोर शिंदे यांच्या पथकाने केला नक्षलवाद्यांचा खात्मा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
25 May :- बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवीआष्टी या गावचे रहिवासी असलेले पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे हे सध्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली उपविभागातील चमके कोटमेपेढी जंगल भागामध्ये नक्षल विरोधी अभियान चालवत असताना जंगलात नक्षलवाद्यांच्या हालचालीवर नजर ठेवून त्यांची माहिती घेऊन कारवाई करत असताना नक्षलवाद्यांकडून पोलिस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला जात असताना प्रतिकार दाखवत समयसूचकता आणि बुद्धी कौशल्याचा वापर करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे हे प्रभारी असलेल्या पथकाने कोणतीही अप्रिय घटनेशिवाय १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश प्राप्त केले. नक्षलवाद्यांकडून मोठ्याप्रमाणावर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आले.गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी विशेषपत्राद्वारे पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे व पथकाचे, कर्मचार्यांचे कौतुक केले आहे.