सुखद, राज्यात कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
25 May :- राज्यातील कोरोनोची दुसरी लाट ओसरत असल्याचं पहायला मिळत आहे. राज्यातील बाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेटही दिवसेंदिवस वाढत आहे. आज राज्यात 36,176 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 52,18,768 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 92.76 टक्के इतके झाले आहे.
आज राज्यात 24,136 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात एकूण 3,14,368 सक्रिय रुग्ण आहेत. सध्या राज्यात 26,16,428 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 20,829 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,35,41,565 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,26,155 म्हणजेच 16.77 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.