बीडमराठवाडा

रुग्णांना लुबाडणाऱ्या दवाखान्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 May :- जालन्यात रुग्णांकडून अतिरिक्त बिल वसूल करणाऱ्या दवाखान्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे. कोरोनाच्या भयंकर महामारीत आरोग्यमंत्र्यांच्या गावातीलच दवाखान्यांनी रुग्णांकडून केलेल्या जास्तीच्या पैशाची आकारणी या दवखान्यांच्या अंगलट आली आहे. शहरातील 12 दवाखान्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली असून तब्बल 291 रुग्णांकडून आकारलेल्या बिला पोटी 17 लाख रुपये भरण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या रुग्णांसाठी शासनानं दर पत्रक निश्चित केलंय त्याची आकारणी व्यवस्थित होते का हे पाहण्यासाठी शासनाने ऑडिटर देखील नेमले आहेत. मात्र हॉस्पिटल्सकडून अतिरिक्त बिल वसुलीचा आलेख या पेक्षा जास्त असून गेल्या काही महिन्यात रुग्णांकडून कोट्यवधी रुपयांची अतिरिक्त बिल वसूली केल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. अनेक रुग्ण नातेवाईकांकडून अतिरिक्त बिल वसुली बरोबरच खाजगी हॉस्पिटलकडून अॅडव्हान्स डिपॉझिटची रक्कम देखील मागितली जात असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.

जालना जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 16.82 आहे. आजवर एक हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज करवाई करण्यात आलेल्या 12 दवाखान्यांपैकी दोन दवाखान्यांवर यापूर्वी अशीच कारवाई झाली होती. मात्र असे असताना त्यांच्याकडून पुन्हा अतिरिक्त बिल वसुली होत असेल तर आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या जिल्ह्यात प्रशासनाला या खाजगी दवाखान्यांच्या वसुलीला कायमचा पायबंद घालणे गरजेचे आहे.