राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
22 May :- कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा कहर राज्यात आता कमी होऊ लागल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. राज्यात दिवसा 60 ते 65 हजारांपर्यंत गेेलेली रुग्णसंख्या आता घसरणीला लागली आहे. आज राज्यात एकूण 22122 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 361 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार दरदिवशी सापडणाऱ्या रुग्णसंख्येमध्ये मोठी घट झाल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे. काल रविवारी 26 हजार 133 रुग्णांची नोंद झाली होती.
रविवारी राज्यात कोरोनाचे नवे 26 हजार 672 रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधीलरुग्णसंख्येचा विचार करता गेल्या दोन महिन्यांमधला हा सर्वात कमी आकडा होता. सोमवारी त्याहीपेक्षा कमी नवे रुग्ण सापडले. सोमवारी सर्वसाधारणपणे इतर दिवसांच्या मानाने नवी रुग्णसंख्या कमीच येते, असा ट्रेंड आहे. रविवारी अनेक ठिकाणी लॅब टेस्टिंग बंद असल्याचा तो परिणाम मानला जातो. पण तरीही 24 मे ची संख्या गेल्या कित्येक सोमवारपेक्षाही कमीच आहे.
42,320 कोरोना रुग्ण आज बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण 51,82,592 कोरोना रुग्ण या आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असून हा दर 92.51% एवढा झाला आहे. राज्यभरात 361 रुग्णांचा आज मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.59 टक्के आहे. सध्या 27,29,301 रुग्ण गृह अलगीकरणात असून 24,932 लोक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट