News

बीड शहर ८ दिवस लॉकडाऊन

बीड दि .२७ ( प्रतिनिधी ) :- बीड मध्ये पॉझिटिव्ह ठरलेल्या एका रुग्णाने बीड शहरात अनेक ठिकाणी मोटारसायकलवर भेटी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे . त्यानंतर पुढील आठ दिवस संपूर्ण बीड शहरासह जिल्ह्यातील बारा गावात पूर्णत: कर्फ्यूं लावण्याची घोषणा बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली आहे . त्यामुळे बुधवारी रात्री बारा वाजल्या पासून पुढील आठ दिवस शहरासह बारा गावे पूर्णत : बंद राहणार आहे . 

       बीड जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर येत आहे . त्यातीलच एक बाधित रुग्ण बीड शहरात अनेक ठिकाणी फिरल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे . बुधवारी जिल्हा प्रशासनाने बीड शहरातील काही भाग कंन्टेन्मेन्ट झोन म्हणून जाहीर केले होते . त्यानंतर आता संपूर्ण बीड शहरासह जिल्ह्यातील बारा गावे पुढील आठ दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .   या काळात बीड शहरासह बारा गावात संपूर्ण कर्फ्यूं ! लागू करण्यात येणार असून मेडिकल दुकाने , दवाखाने , वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे .
   ही बारा गावे राहणार बंद
 बीड शहरा सोबतच बीड तालुक्यातील खंडाळा , च-हाटा, पालवण , इट , पाटोदा तालुक्यातील वैजाळा , डोंगरकिन्ही , केज तालुक्यातील खरमाटा , धारुर तालुक्यातील पारगाव , वडवणी तालुक्यातील देवडी , गेवराई तालुक्यातील खांडवी , मादळमोही , धारवंटा ही गावे पुढील आठ दिवस म्हणजे ४ जुनपर्यंत पुर्णतः बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत . 

One thought on “बीड शहर ८ दिवस लॉकडाऊन

  • धुराजी राऊत

    अतिशय जलद व वस्तुनिष्ठ वृत्तआहे

Comments are closed.