बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन वाढला!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
बीड दि. 24 (प्रतिनिधी ) जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन दि.25 मे रोजी रात्री 12 पर्यंत लावण्यात आलेला होता. मात्र आता त्यात आणखी 6 दिवसांची वाढ करण्यात आली असून दि. 31 मे रात्री 12 पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज दुपारी आदेश काढले आहेत. केवळ भाजीपाला फळे विक्रीसाठी सकाळी 7 ते 9 सवलत देण्यात आली आहे. अन्य आस्थापना सुरू राहणार नाहीत असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोविड १९ विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता दिनांक २५.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपासून ते ३१.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपर्यंत खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
१. दिनांक २५.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपासून ते ३१,०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० चे या दरम्यान केवळ खालील आस्थापना पूर्णवेळ सुरु | राहतील. सर्व औषधालये ( Medical), दवाखाने, निदान क्लिनीक, लसीकरण केंद्रे, वैद्यकिय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्या, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकिय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा इ. उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत .
२. दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ०७.०० ते १०.०० वाजेपर्यंत सुरु राहील.
३. भाजीपाला विक्रीस केवळ हातगाडीवरुन प्रत्येक दिवशी सकाळी ०७.०० ते ०९.०० वाजेपर्यंत परवानगी राहील.
४. गैस वितरण दिवसभर सुरु राहील
५. बैंक / ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १०.०० ते दु .०१.०० वाजेपर्यंत केवळ शासकीय व्यवहार, पेट्रोलपंप व गैस एजन्सी धारकांचे व्यवहार, कृषी निविष्ठांशी संबंधित व्यवहार, वैद्यकिय कारणास्तव केले जाणारे व्यवहार, सर्व opr-bontaypartlor-a36 शासकीय योजनेचे लाभार्थी यांचे वेतनाबाबतचे व्यवहार, अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणा-या आस्थापना यांना या वेळेत बँकेत जाऊन व्यवहार करण्यास मुभा असेल. दरम्यानच्या काळात एटीएम कैशच्या वाहनांना परवानगी असेल, तसेच दुपारी ०१.०० ते ०४.४५ वाजेपर्यंत बँकेचे कर्मचारी यांना केवळ अंतर्गत कामकाजास मुभा असेल.
६. शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे सुरु राहतील. ( ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल . )
७. लसीकरणा करीता ४५ बर्षावरील ज्या व्यक्तींना मेसेज आला आहे / आरोग्य विभागाचे पत्र आले आहे. त्यांनाच लसीकरणचा डोस घेण्यासाठी जाण्यास मुभा असेल. ( लसीकरणासाठी आलेला मेसेज / आरोग्य विभागाचे पत्र, आधार कार्ड सोबत असणे आवश्यक असेल. )
८. कृषी व्यवसायाशी संबंधित बि बियाणे, खते, औषधे यांची जी दुकाने आहेत त्या दुकान मालकास आलेख्ने बि-बियाणे, खते, औषधे केवळ गोडाऊनला किवा दुकानामध्ये उतरुण घेण्यास मुभा असेल, तसेच कृषि विक्रत्याना शतकन्यांना बियाणे, खते, औषधे विक्रीस / खरेदीस सकाळी ०७.०० ते दुपारी ०१.०० वाजेपर्यंत परवानगी असेल, १. नरेगाची कामे सुरु राहतील, त्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क, सैनिटायझर चा व कोविड १ ९ विषयक जे नियम आहेत से पाळणे बंधनकारक असेल.
१०. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांनी दिनांक २६.०५.२०२१ पासुन सकाळी ०७.०० ते दुपारी ०१.०० या वेळेतच लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यास मुभा राहील. ( राशनसाठी जाणा- या व्यक्तीच्या सोबत राशनकार्ड, आधार कार्ड असणे आवश्यक आहे. )११. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या पूर्णवेळ पूर्णपणे बंद राहतील. दिनांक २५/०५/२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपासून ३१/०५/२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपर्यंत या कालावधीत निबंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सिल करण्यात येऊन त्यांचा परवाना रत करण्याची कारवाई करण्यात येईल, सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस याणा आणि सर्व संबंधित विभागाची राहील.