महाराष्ट्र

राज्याला मोठा दिलासा! रुग्णसंख्येत पडली मोठी घट

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 May :- महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये होणारी घट रविवारीदेखिल पाहायला मिळाली. रविवारी राज्यात कोरोनाचे नवे 26 हजार 672 रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधील रुग्णसंख्येचा विचार करता गेल्या दोन महिन्यांमधला हा सर्वात कमी आकडा आहे. पण कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी 594 रुग्णांचा रविवारी कोरोनामुळं मृत्यूदेखिल झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीचा विचार करता सध्या राज्यामध्ये कोरोनाच्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 लाख 48 हजार 395 एवढी आहे. तर राज्यात आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 55 लाख 53 हजार 225 वर गेली आहे. तर आतापर्यंतच्या मृतांचा आकडा हा तब्बल 87 हजार 300 एवढा झाला आहे.

गेल्या 24 तासांमध्ये कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा 29,177 झाला आहे. त्यामुलं राज्यात आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा 51 लाख 40 हजार 272 झाला आहे. राज्यात रविवारी कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांचा आकडा हा 594 एवढा आहे. त्यामुळं मृत्यूदर ही काहिशी चिंतेची बाब समजली जात आहे. सध्या कोरोनाच्या रुग्णांचा राज्यातील मृत्यूदर हा 1.59% एवढा आहे. पुणे आणि मुंबईतील आकडे दिलासा देत असले तरी अहमदनगरमध्ये रविवारी कोरोनामुळं झालेल्या मृत्यूचा आकडा 39 होता. त्यामुळं प्रशासनासमोर ही चिंतेची बाब बनली आहे. तर कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा घटला आहे. राज्यातील सद्याचा कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 16.9% एवढा आहे.