महाराष्ट्र

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी भूकंपाचे धक्के

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 May :- महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील काही भागांत भूकंपाचे काही सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंपाची 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के साताऱ्यात जाणवले आहेत. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले. कोयनापासून अवघ्या 10 किलोमीटरच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे. अचानक जाणवलेल्या धक्क्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. परंतु, सौम्य धोका असल्यामुळं कोणतीही हानी झालेली नाही. तसेच कोयना धरणाला कुठलाही धोका नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं ही माहिती दिली आहे. सकाळी मणिपूरमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के आज सकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी उखरूल, मणिपूरमध्ये जाणवले.

दरम्यान, मणिपूरमध्ये जाणवलेले भूकंपाचे धक्केही सौम्य असून कोणतीही जीवीतहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. दरम्यान, यापूर्वी 8 मे रोजीही साताऱ्यात भूकंपाचे काही सौम्य धक्के जाणवले होते. दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी कोयना परिसरात भूकंपाचा पहिला धक्का जाणवला होता. हा धक्का 2.8 रिश्टर स्केल इतका होता. त्यानंतर अवघ्या 3 मिनिटांच्या अंतरानं येथे दुसरा धक्का बसला होता. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते.