बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचा आलेख घसरणीला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 May :- बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्गाचा आकडा कमी जास्त होत आहे. आज आलेल्या अहवालामध्ये 962 जण पॉझिटिव्ह आढळून आले. एकूण 7937 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आला असून 8929 जणांचे स्टॅब तपासण्यात आले होते.

राज्यात कोरोनाचा आकडे कमी होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. बीड जिल्ह्यातही काही प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या कमी होवू लागली. दोन दिवस पॉझिटिव्ह रुग्णांचा आडा 800 च्या दरम्यान होता. आज काही प्रमाणात वाढ झाली. 962 पॉझिटिव्ह आढळून आले.7967 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 8929 जणांची तपासणी करण्यात आली. अंबाजोगाई 64 आष्टी-83 बीड -268 धारूर-81 गेवराई-88 केज-89 माजलगाव-47 परळी -26 पाटोदा-78 शिरूर – 109 तर वडवणी येथे 29 रुग्ण आढाळले आहेत