महाराष्ट्र

लॉकडाऊन 1 जूनला संपणार का?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 May :- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 1 जून 2021 सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख उतरणीला आल्याचं चित्र आहे. त्यातच ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शिवभोजन थाळी आता 14 जूनपर्यंत मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन 1 जूनला संपणार, वाढणार की निर्बंध हळूहळू शिथील होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. तर दुसरीकडे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमधून काहीशी सूट मिळेल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनबाबत आता काय निर्णय होतो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

लॉकडाऊनबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. या निर्णयाला चारच दिवस झाले आहेत. कोरोनाची स्थिती आटोक्यात आलेली नाही. सध्याच्या लॉकडाऊनचे परिणाम काय होतात हे पाहून पुढील निर्णय घेऊ. सध्याची परिस्थिती पाहता लवकरच आढावा बैठक होईल. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर संचारबंदीमध्ये सूट देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.” “मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परंतु ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांमध्ये घट झालेली नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता ऑक्सिजनचा योग्य पुरवठा आवश्यक आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले.