महाराष्ट्र

मोठा दिलासा! राज्यात आज 40,294 रुग्ण कोरोनामुक्त मात्र

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 May :- महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेटही सातत्याने वाढतआहे. राज्यासाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. मात्र, त्याच दरम्यान राज्यातील कोरोना बाधित मृतकांच्या संख्या ही चिंता वाढवणारी ठरत आहे. कारण, दररोज मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे.

आज राज्यात 40294 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 51,11,095 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 92.04 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 26,133 नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात सध्या एकूण 3,52,247 सक्रिय रुग्ण आहेत. आज राज्यात 682 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 392 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत तर 290 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.57 टक्के इतका आहे.