मोठं आव्हान! देशात आतापर्यंत आढळले म्युकोरमायकोसिसचे 7 हजारपेक्षा जास्त रुग्ण
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
एकिकडे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात देशाला यश मिळताना दिसतं आहे. भारताला मोठा दिलासा मिळतो आहे. तर दुसरीकडे मात्र कोरोनाशी संबंधित आणखी काही आजारांचं आव्हान उभं ठाकलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे म्युकोरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. अवघ्या काही दिवसांत हजारो रुग्ण सापडले आहेत, तर शेकडोंचा बळी गेला आहे. विशेष म्हणजे ज्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते, त्याच महाराष्ट्रात आता म्युकोरमायकोसिसचेही सर्वाधिक रुग्ण आहेत.
आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे 7 हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. 200 पेक्षा जास्त रुग्णांचा या आजाराने जीव घेतला आहे. या आजाराचे एकूण 7250 रुगिण सापडले आहेत. सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू हे महाराष्ट्रातच झाले आहेत. त्यानंतर गुजरात आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये 1163 रुग्ण आणि 63 मृत्यू, तर मध्य प्रदेशमध्ये रुग्ण आणि 31 मृत्यू आहेत. इतर राज्यातही काही प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. पुण्यातील कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत असतानाच आता पुन्हा पुणेकरांची चिंता वाढली आहे.
राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात होते आणि आता म्युकरमायकोसिस आजाराचे सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातच असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या पाठोपाठ म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण हे नागपूर जिल्ह्यात आहेत.पुण्यात म्युकरमायकोसिसचे 273 रुग्ण आहेत. त्यानंततर नागपुरमध्ये 148 रुग्ण आहेत. औरंगाबादमध्ये 67 रुग्ण आहेत. नांदेडमध्ये 60, चंद्रपुरात 48, लातूर 28 तर ठाण्यात 22 रुग्ण आहेत.
राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराची तीव्रता वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. त्यासाठी लागणार खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडून नये यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रुग्णालयांमध्ये म्युकोरमायकोसिस आजारावर उपचार करण्यात येणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.