पेठ बीडमध्ये घरावर दगडफेक
बीड :- पेठ बीड भागामध्ये दोन नगरसेवकातला वाद रात्र उफाळून आला. एका नगरसेवकाच्या घरावर दुसर्या नगरसेवकाच्या समर्थकांनी दगडफेक केली असल्याचे समजते.याबाबत पेठ बीड पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
दोन नगरसेवकांच्या गटांध्ये रात्री वाद झाला असता वाद विकोपाला जावून एका नगरसेवकाच्या घरावर दुसर्या प्रतिस्पर्धी नगरसेवकाच्या समर्थकांनी दगडफेक केली असल्याचे समजते. या घटनेवरून सदरील भागामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.