भारत

गुजरातला 1 हजार कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 May :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गुजरात राज्यात पोहोचले आहेत. प्रभावित भागाची हवाई सफर करत ते चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद येथे एक बैठक घेतली. या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते.

या बैठकीनंतर तौक्ते चक्रीवादळामुळे प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाना 2 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. तर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहे. तोक्ते चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत 45 जणांचा तर महाराष्ट्रात 6 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधानांनी आज केवळ गुजरातचा दौरा केला. पाहणीनंतर पंतप्रधान मोदींनी गुजरातला तातडीच्या मदतीसाठी 1 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. गुजरातप्रमाणे महाराष्ट्र, गोव्याल्या देखील चक्रीवादळाचा फटका बसला आहे