बीड

कडक निर्बंध आणि संचारबंदीमुळे रुग्णवाढ आटोक्यात! आज आढळले ‘इतके’ रुग्ण पॉझिटिव्ह

4 हजार 56 संशयितांची करण्यात आली कोरोना चाचणी

16 May :- बीड जिल्ह्यात मार्च महिन्यापासून वाढत जाणार्‍या कोरोनाचा प्रादुर्भाव आता आटोक्यात येवू लागला आहे. गत 15 ते 20 दिवसापासून जिल्ह्यात तब्बल 1200 ते 1500 च्या घरात रुग्ण निष्पन्न होत होते. त्यामुळे रुग्णालयात बाधित रुग्णांना उपचारासाठी खाटा मिळणेही अशक्य होवून बसले होते. याही परिस्थितीत आरोग्य विभागाने रुग्णांवर उपचार केले. असे असतांनाच आता कोरोना बाधितांची संख्या कडक निर्बंधामुळे व संचारबंदी कायम ठेवल्याने कमी होवू लागली आहे. आज रविवारी जिल्ह्यात केवळ 897 नवे कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाले आहे.

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

जिल्ह्यत शनिवारी 4 हजार 56 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल आज रविवारी दुपारी प्राप्त झाले. यात 3 हजार 159 अहवाल निगेटिव्ह आले तर 897 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 97, आष्टी 119, बीड 116, धारुर 48, गेवराई 77, केज 136, माजलगाव 71, परळी 57, पाटोदा 102, शिरुर 40 आणि वडवणी तालुक्यातील 374 जणांचा समावेश आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज 16 ते 25 मे या दरम्यान संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच राज्यातही 31 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रुग्णांची कमी होणारी संख्या दिलासा देणारी ठरली आहे.