बीड

अबबं…बीडमध्ये एका दिवसात दारुड्यांचा उच्चांक

बीड : संसर्गजन्य कोरोना व्हायरसमुळे देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापना बंद करण्यात आल्या होत्या. यामध्ये दारुचीही दुकाने बंद होती. मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दारु दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यानंतर एका दिवसातच बीड जिल्ह्यामध्ये 62 हजार लिटर दारू विकी झाल्याची नोंद आहे.

दारु दुकाने बंद केल्यानंतर सुरु कधी होणार असा प्रश्न मद्य प्रेमींना पडला होता. अखेर मंगळवारी (दि.26) मद्यप्रेमींसाठी खुशखबर मिळाली. अन् दारू दुकान उघडण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली. मंगळवारी सकाळी दारू दुकाने उघडल्यानंतर जिल्हाभरामध्ये दारु दुकानांसमोर मद्य प्रेमींची रांगाच रांगा बघायला मिळाल्या.

काही ठिकाणचा गोंधळ सोडला तर जिल्हाभरामध्ये मद्य प्रेमींना अगदी शिस्तीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचे दिसून आले. मंगळवारी जिल्हाभरामध्ये देशी दारु 28 हजार 469 लिटर, विदेशी दारू 19 हजार 63 लिटर तर बिअर 14 हजार 586 लिटर विक्री करण्यात आली. अशी नोंद राज्य उत्पादन शुल्क विभाग बीड यांच्याकडे आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मीक यांनी दिली आहे. त्यामुळे एकाच दिवशी बीड जिल्हावासीयांनी 62 हजार लिटर दारु ढोसल्याची नोंद