भारत

देशात लॉकडाऊनच्या चर्चेला उधाण, यातच राहुल गांधींनी केली ‘ही’ मागणी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 May :- भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लावण्याबाबतीच चर्चा सुरू आहेत. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्यायच नाही, असे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे देशात लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये राहुल गांधी म्हणाले की, ‘केंद्र सरकारच्या ढिसाळ कामगिरीमुळे देशात कोरोना वाढला. सरकारच्या निष्क्रियतेमुळेच अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. आता देशातील कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन केल्याशिवा दुसरा पर्याय नाही’, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

देशात कोरोना महामारीची लाट येऊन 15 महिने उलटले आहे. दरम्यान, देशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर आणि अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासत आहे. विशेष म्हणजे भारतात 15 महिन्यांच्या कोरोनाकाळात एकूण रुग्णांची संख्या 2.02 कोटी झाली आहे. यापैकी 1.66 कोटी कोरोनामुक्त झाले आहेत. 35 लाखांवर उपचार सुरू आहेत. 2.22 लाख लोकांचा मृत्यू झाला.