बीड

बीड जिल्ह्यात ‘कडकडीत’ लॉकडाऊन

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 May :- बीड जिल्ह्यात मार्च महिन्याच्या 26 तारखेपासून लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही बीड जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण आटोक्यात येण्याचे काही चिन्ह दिसून येत नाहीत. याच सर्व गोष्टींचा विचार करत बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने ३ मे रोजी रात्री उशिरा आदेश जारी केले आहेत.

आदेशात म्हटल्याप्रमाणे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, दिनांक ५, ६, ७ या तीन दिवशी केवळ वैद्यकीय आस्थापना व पेट्रोल पंप सुरू राहणार. विक्री तर दिवसभर गॅस विक्री करता येणार आहे.
बँकांचे अंतर्गत कामकाज व शासकीय व्यवहार सकाळी १० ते १२ या वेळेत सुरू राहतील.

बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचा नवा आदेश


शनिवार व रविवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत मांसाहार, किराणा, अन्नपदार्थांची दुकाने सुरू राहतील.
सायंकाळी 5 ते 7 या वेळेत केवळ हातगाड्यावरून फळविक्री करता येईल.