महाराष्ट्र

खळबळजनक प्रकार! कोविड सेंटर परिसरात सोडले 6 ते 7 विषारी साप

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप


3 May :- उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरच्या अजुबाजुच्या परिसरात एका सर्पमित्राने पकडून आणलेले 6 ते 7 विषारी साप सोडल्याने परिसरात आणि कोविड रुग्णालयात भीतीचं वातावरण पसरलं आहे. शहरात कुठेही साप निघाला की, सर्प मित्राला बोलावण्यात येतं, सर्प मित्र सापाला पकडून सुरक्षित जंगलात सोडतात, पण अकरम नावाच्या सर्पमित्राने पकडलेले हे साप चक्क रुग्णालयात सोडल्याने खळबळ उडाली आहे.

काही कर्मचाऱ्यांनी या सर्पमित्राला वेळीच हटकलं म्हणून काही साप त्याने पकडून नेले, पण रुग्णालाय परिसरात साप त्याने का सोडले? याचं कारण अद्याप कळू शकलं नाही. मलकापुरातील या कोविड सेंटर परिसरात अत्यंत घाणीचं साम्राज्य असल्याने परिसरात नेहमीच साप निघतात, आता तर सर्पमित्रसुद्धा या रुग्णालय परिसराला जंगल म्हणून सर्पमित्र या परिसरात साप सोडतात.सदरील घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरा येथे घडली आहे.