महाराष्ट्र

रेमडेसिविरचा काळाबाजार; 3 महिला नर्ससह 6 अटकेत

3 May :- रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या सहा जणांच्या एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. या कारवाईत तीन महिला नर्ससह सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून चार इंजेक्शन, ९० हजार रुपये रोख, दुचाकी, तीन मोबाइल व औषध साठा असा १ लाख ७० हजार ९६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

अनिकेत रंभाड ढवळे (३० रा. भंडारा), बबन मन्साराम बुधे (३५), सचिन अशोक हुमणे (२९ दोघेही रा. म्हाडा कॉलनी भंडारा), खुशबू विजय इलमकर (२२), करिष्मा तेजराम पारधी (२१ दोघे रा. विदर्भ हाउसिंग कॉलनी, भंडारा), आचल नागदेवते (२५ रा. वर्धा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचा गैरफायदा घेऊन मूळ किमतीपेक्षा जादा दराने त्याची विक्री करण्याचा गोरख धंदा ही टोळी करत होती. बबन बुधेच्या माध्यमातून सदर रेमडेसिविर खरेदीचा सौदा करण्यात आला. एका मेडिकल दुकानासमोर ४ इंजेक्शन १ लाख २० हजार रुपयांत देण्याचे ठरले. या वेळी पोिलसांनी परिसरात सापळा रचला. यात बुधे व सचिन हुमनेंना रंगेहाथ पडकले. त्यानंतर अनिकेत ढवळे, करिष्मा पारधी, खुशबू इलमकर यांना ताब्यात घेण्यात आले.


करिष्मा व खुशबूच्या घरांची झडती घेतली असता त्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रोख ९० हजार रुपये व मोठ्या प्रमाणात औषध साठा सापडला. पाचही जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता वर्धा जिल्ह्यातील आचल नागदेवते हिचे नाव समोर आले. तिघीही नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी असून शहरातील विविध रुग्णालयांत कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक प्रशांत रामटेके यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी सहाही जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक केली.

मिरजच्या रुग्णालयातून आणखी ६ रेमडेसिविर इंजेक्शन गायब
सांगली| मिरज शासकीय कोविड रुग्णालयातून आणखी सहा रेमडेसिविर इंजेक्शन गायब असल्याने कर्मचाऱ्यांची झाडाझडती सुरू आहे. प्रशासनाने पोलिसांत अद्याप तक्रार केली नाही. चार दिवसांपूर्वी सिव्हिल मधील अधिपरिचारक सुमित हुपरीकर आणि खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ दाविद वाघमारे बाजार प्रकरणी पोलिसांनी अटक केली.

समितीने रुग्णालयातील विविध वार्डातील रेमडेसिविर साठ्यांची तपासणी केली असता दोन इंजेक्शनचा हिशेब लाग नसल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. याबाबत संबंधित कामर्चाऱ्यांची झाडाझडती सुरू असतानाच सहा रेमडेसिविर इंजेक्शन गायब स्पष्ट झाले. आठ इंजेक्शन कोठे गेले, याबाबत चौकशी सुरू आहे. हुपरीकर व वाघमारेंच्या चौकशीतून पोलिसांना सूत्रधारांपर्यंत पोहोचता आले नाही. सदरील घटना भंडारा येथे घडली आहे.