News

रायमोह येथे चिंता वाढली परिवारातील १३ सदस्य बीडला हलविले

कारेगाव येथिल कोरोना रुग्णांमुळे डोंगरकिन्ही ,अंमळनेर,रायमोह येथे चिंता वाढली
परिवारातील १३ सदस्य बीडला हलविले.
अंमळनेर (प्रतिनिधी)
दि.२६ रोजी कोरेगाव तर पाटोदा येथिल एक ६९ वृध्द कोरोना संक्रमित आढळल्याने डोंगरकिन्ही ,अंमळनेर व रायमोह येथे चिंता वाढली आहे. स्लॅब तपासणी साठी परिवारातील १३ सदस्य बीडला हलविले आहेत.
रेडझोन मुंबई येथुन कोरेगा व पाथर्डी येथिल एकुण ७४ जण आले होते त्यातील २२ जण कारेगाव येथे आले होते. यातील एका वृध्दास दि २१ तारखेस श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने प्रा. आ .केंद्र डोंगरकिन्ही येथे डॉ. भोंडवे मॅडम यांनी तपासले होते. त्यावेळी लक्षणे दिसत नव्हती मात्र बीडला जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र हा रुग्न पॅराडाईज हॉस्पिटल व विवेकानंद हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल होता. विवेकानंद हॉस्पिटलने बीड सिव्हीलला पाठवले.स्वॅब तपासणीत पॉझिटिव्ह सापडला अन कोरेगाव, डोंगरकिन्ही, रायमोह, पॅराडाईज हॉस्पिटल, विवेकानंद हॉस्पिटल येथे चिंता वाढली. त्यातच यारुग्नाच्या पत्नीस त्रास जाणवल्याने डॉ. कोल्हे हॉस्पिटल येथे उपचार केले ,या दवाखान्यात पांगरी, जाटनांदुर, भिलारवाडी,भाटेवाडी , डोंगरकिन्ही, नाळवंडी, जाधववाडी, मांडवेवाडी, उखळवाडी, धोपाटा, मिसाळवाडी येथिल रुग्ण तपासणी साठी आले होते. दरम्यान कारेगाव येथिल लोक विशेषतः या परिवारातील सदस्य डोंगरकिन्ही, रायमोह येथिल बाजारपेठेत फिरले आहेत तर सेवा केंद्रातुन पैसेही काढल्याचे बोलले जाते. काही शेतीविषयक साहित्य रायमोहा येथुन खरेदी केली आहे. प्रा .आ. केंद्राचे वैद्यकिय अधिकारी मयूर शिंदे कारेगाव येथे तळ ठोकून आहेत. या परिवारातील एकुण १३ सदस्य स्लॅब तपासणी साठी बीडला हलविले आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने कोरेगाव, उखळवाडी,जन्नेवाडी, मोरजळवाडी, भोसलेवस्ती, मुळीकवाडीत, नाळवंडी आदी गावे कन्टनमेंट झोन जाहीर केले आहे.