बीड

क्रिकेटपटू के. एल. राहुल रुग्णालयात दाखल

वैद्यकीय उपचार करुनही थांबत नव्हत्या वेदना

2 May :- पंजाब किंग्जचा कॅप्टन के. एल. राहुल याला पोटात दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. के. एल. राहुल याच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. उर्वरित सामन्यांमध्ये के. एल. राहुल पंजाबसाठी खेळू शकेल की नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

काल रात्री के.एल. राहुलच्या पोटात वेदना सुरु झाल्या होत्या. प्राथमिक वैद्यकीय उपचार करुनही वेदना थांबत नव्हत्या.यानंतर तातडीनं पुढील तपासणी केली असता त्याला अ‌ॅपेंडिक्स असल्याचं समोर आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं केल राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता राहुलवर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे.