बीड

पालकमंत्री धनंजय मुंडेंचे कडक आदेश

लोक घरात बसणार नाहीत तोपर्यंत कोरोना आटोक्यात येणार नाही- मुंडे

1 May :- बीड जिल्ह्यात कोरोना वाढत असताना बाहेरून शटर बंद अन आत सगळं चालू अशी स्थिती आहे,असलं मिळमिळीत लॉकडाऊन काही कामाच नाही असं म्हणत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोलीस अधीक्षक यांना स्वतः लक्ष घालून कडक लॉक डाऊनची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. जोपर्यंत लोक घरात बसणार नाहीत तोपर्यंत कोरोना आटोक्यात येणार नाही, त्यामुळे लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

ZunjarNeta Live! वर प्रेस करा आणि ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा व व्यापक लसीकरण मोहिमेच्या धोरनासंदर्भात आयोजित बैठकीत मुंडे यांनी आपले मत व्यक्त केले. या बैठकीस आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक आर. राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांसह सर्व विभागातील महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.