बीडमध्ये नवीन निर्देश लागू
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
30 April :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी कडक निर्बंध लावले आहेत. औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार बीडमध्ये आज पासून नवीन निर्देश लागू झालेत. आता यापुढे घराबाहेर पडायचे असल्यास नागरिकांना आधार कार्ड जवळ बाळगणे बंधनकारक असणार आहे. आणि याच अनुषंगाने बीड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलाय. यावेळी प्रत्येक व्यक्तीचं आधार कार्ड तपासले जातेय. योग्य कारण असल्यास सोडण्यात येत असून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई देखील केली जात आहे.
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी सात ते अकरा या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी वाहनाद्वारे कोणत्याही व्यक्तीस बाहेर जायचे असल्यास त्या सोबत आधार कार्ड बाळगणं अनिवार्य राहणार आहे. आधार कार्ड नसल्यास संबंधित व्यक्ती कारवाईस पात्र ठरेल ॲम्बुलन्स मधील कर्मचारी व रुग्णांना यातून सूट देण्यात आली आहे. त्याबरोबरच हेल्मेटचा वापर करणे देखील अनिवार्य राहील, यामुळे डोळ्यांना कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होणार नाही.
बीड जिल्ह्यात आजही कोरोनाबधितांची विक्रमी नोंद