महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी साधणार संवाद

‘या’ मुद्द्यांवर राज्यातील जनतेशी साधू शकतात संवाद

30 April :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. लसीकरण असो, लॉकडाऊन असो किंवा सरकारची विविध धोरणं असोत, तसेच कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीशी लढण्याची सरकारची तयारी यासंदर्भात मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता आहे.

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

उद्या महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशातच आरोग्य यंत्रणेवरही प्रचंड ताण आलेला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊनही जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून धडा शिकून राज्य सरकारनं तिसऱ्या लाटेसाठीही तयारी सुरु केली आहे. यासर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री आज राज्यातील जनतेशी संवाद साधू शकतात.