बीड जिल्ह्यात आजही कोरोनाबधितांची विक्रमी नोंद
काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!
30 April :- बीड जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण अतिशय वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या या वाढत्या संक्रमणात प्रत्येकाने जर काळजी घेतली, लक्षण आढळतातच तात्काळ उपचार घेतले तर कोरोनातून बरे होणे शक्य आहे. काही नागरिक कोरोनाला सहजरित्या घेऊन लॉकडाऊन दरम्यानही गल्लीत ठिकठिकणी एकत्र येत आहेत मोठ्या संख्येने जमत आहेत म्हणून कोरोना संक्रमणाचा वेग लॉकडाऊन दरम्यानही कमी होत नसून उलट वाढतच चालला आहे.
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आवश्यकतेनुसारच जर घराबाहेर पडले आणि ठिकठिकाणी तोंडावर मास्क आणि सोशल डिस्टन्सचं पालन केलं तर कोरोनाचे वाढते संक्रमण आटोक्यात येणं सहज शक्य आहे.
बीड जिल्ह्यात आज दि 30 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4717 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1520 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3197 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई 236 आष्टी 187 बीड 298 धारूर 86 गेवराई 155 केज 198 माजलगाव 65 परळी 116 पाटोदा 65 शिरूर 80 तर वडवणी येथे ३४ रुग्ण आढळले आहेत.