धनंजय मुंडेंचा भावनिक सल्ला! पंकजाताई, काळजी घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे
पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण
29 April :- राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. असे असताना अनेक राजकारणीही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली. यानंतर त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ताईला भावनिक सल्ला दिला आहे. तसेच मोठा भाऊ म्हणून मी नेहमी सोबत आहे असेही म्हटले आहे. यानंतर धनंजय मुंडेंच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे.
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
पंकजा मुंडे यांनी आज सकाळी एक ट्वीट करत त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की, ‘माझा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून विलिगिकरणात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या भेटी घेतल्या होत्या. याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात जे आले आहेत त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी’ असे पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले होते.
पंकजा मुंडे यांच्या पोस्टवर धनंजय मुडेंनी काळजीचा सल्ला दिला आहे. तसेच आपल्या बहिणीप्रती काळजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ‘ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या पंकजाताई’