भारत

रिलायन्स फाऊंडेशन उभारणार 1000 बेड्सचं कोविड सेंटर

रूग्णांना मिळणार मोफत उपचार सुविधा

29 April :- देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. दररोज लाखोंच्या संख्येने नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार तसेच अनेक खाजगी कंपन्या आणि स्वयंसेवी संस्था कोविड संक्रमित रूग्णांच्या उपचाराशी संबंधित पायाभूत सुविधा सुधारण्यात गुंतल्या आहेत. आता रिलायन्स फाऊंडेशननेही याकामी पुढाकार घेतला आहे.

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

गुजरातमधील जामनगरमध्ये ऑक्सिजन पुरवठा करणारे 1000 खाटांचे कोविड रुग्णालय बांधणार आहेत. या रुग्णालयात रूग्णांना मोफत उपचार सुविधा मिळतील, असे फाऊंडेशनने म्हटले आहे. फाउंडेशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की जामनगरमधील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय परिसरात आठवड्याभरात 400 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर, येत्या दोन आठवड्यांत जामनगरमध्येच 600 खाटांचे केंद्र बांधले जाईल.

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी सांगितले की, “कोविडच्या दुसर्‍या लाटेचा सामना भारत करत आहे.” आम्ही सर्वतोपरी मदत करण्यास वचनबद्ध आहोत. आरोग्याशी संबंधित अतिरिक्त सुविधा पुरवणे ही काळाची गरज आहे. ” पुढे त्या म्हणाल्या, की “रिलायन्स फाउंडेशन जामनगरमध्ये कोविड रूग्णांसाठी ऑक्सिजनसह 1000 खाटांचे रुग्णालय उभारत आहे. पुढच्या आठवड्यात 400 खाटांचा पहिला टप्पा तयार होईल. त्यातून पुढच्या एका आठवड्यात आणखी 600 बेड तयार होतील. हे रुग्णालय मोफत दर्जेदार सेवा देईल.