सिनेमा,मनोरंजन

74 वर्षीय रणधीर कपूर कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल

कोरोना विषाणूचा संसर्ग अतिशय झपाट्यानं वाढू लागला आहे. कलाविश्वालाही या संसर्गानं विळख्यात घेतलं आहे. 70 आणि 80 च्या दशकात अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

रणधीर कपूर यांना मधुमेह देखील आहे. रणधीर कपूर यांना व्ही.आय.पी वॉर्डमध्ये दाखल केले असून डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेत आहे. काही वेळापूर्वी रुग्णालयाचे सिईओ डॉ. संतोष शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता रणधीर कपूर यांना कोरोनाच्या उपचारासाठी काल रात्री कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

9 फेब्रुवारीला राजीव कपूर यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले होते. तर 30 एप्रिलला बॉलिवूडचे अभिनेते ऋषी कपूर यांचं कॅन्सरमुळे निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रणधीर कपूर यांनी 50 च्या दशकात ‘श्री 420’ (1955) आणि ‘दो उस्ताद’ (1956) बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. 1971 ला रणधीर कपूरने ‘कल आज और कल’ या चित्रपट अभिनेता म्हणून काम केले. वडील राज कपूर आणि आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत रणधीर कपूरचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता.