बीड

बीड कोरोना ब्रेकिंग! जिल्ह्यात आज कोरोनाबाधितांची ‘विक्रमी’ नोंद

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा

29 April :- बीड जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण अतिशय वेगाने वाढत आहे. मात्र तितक्याच प्रमाणात कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याने दिलासा मिळत आहे. कोरोनाच्या या वाढत्या संक्रमणात प्रत्येकाने जर काळजी घेतली, लक्षण आढळतातच तात्काळ उपचार घेतले तर कोरोनातून बरे होणे शक्य आहे.

काही नागरिक कोरोनाला सहजरित्या घेऊन लॉकडाऊन दरम्यानही गल्लीत ठिकठिकणी एकत्र येत आहेत मोठ्या संख्येने जमत आहेत म्हणून कोरोना संक्रमणाचा वेग लॉकडाऊन दरम्यानही कमी होत नसून उलट वाढतच चालला आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आवश्यकतेनुसारच जर घराबाहेर पडले आणि ठिकठिकाणी तोंडावर मास्क आणि सोशल डिस्टन्सचं पालन केलं तर कोरोनाचे वाढते संक्रमण आटोक्यात येणं सहज शक्य आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आज २९ एप्रिल रोजी कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. आज जिल्ह्यात तब्बल १४७० रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. ४, २०९ नमुन्यापैकी ३, ४३२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात २१५, आष्टी १३३, बीड ३२०, धारूर ८४, केज १३१, गेवराई २००, माजलगाव ५२, परळी ११९, पाटोदा ७५, शिरूर कासार ८५, वडवणी ५६ असे रुग्ण आढळून आले आहेत.