बीड

बीडमध्ये 41 हजार 440 रूग्ण कोरोनामुक्त

लक्षण आढळताच, तात्काळ उपचार घेतल्यास रूग्ण शंभर टक्के बरा होतो

28 April :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. २१ ते २६ एप्रिल दरम्यान तब्बल ५ हजार ३०३ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. नागरिकांनी कोरोनाची भिती न बाळगता नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

कोरोना लक्षण आढळल्यास तात्काळ तपासणी केल्यास आणि उपचार घेतल्यास रूग्ण शंभर टक्के बरा होतो. दरम्यान आजही ११०० च्या पुढे रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. २६ एप्रिल पर्यंत बीड जिल्ह्यात एकूण ४६ हजार ३७८ रूग्ण आढळून आले असून यापैकी ४१ हजार ४४० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.