सिनेमा,मनोरंजन

मानसी संतापली; ट्रोल करणाऱ्याला दिले सडेसोड उत्तर

यूझरने केली होती घाणेरडी कमेंट

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक हिला अलीकडेच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अलीकडेच एका लाइव्ह सेशनमध्ये मानसीने तिला ट्रोल करणाऱ्याला सडेसोड उत्तर दिले आहे. त्यामध्ये ट्रोलिंगचा अनुभव सांगताना ती म्हणाली, ‘काही दिवसांपूर्वी माझ्या एका फोटोवर यूझरने मी बुधवार पेठेतील आहे, अशी कमेंट केली होती. ती कमेंट पाहून मला हसूही आले आणि वाईट ही वाटले,’ असे मानसी म्हणाली.

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

यूझरच्या घाणेरड्या कमेंटला उत्तर देताना मानसी म्हणाली, ‘तुम्ही मला बुधवार पेठेत कधी बघितले? आणि तुम्ही तिथे काय करत होतात? बुधवार पेठ ही जागा ज्या स्त्रिया चालवतात त्या स्वतःच्या पोटापाण्यासाठी ते काम करतात. त्या त्यांच्या हिंमतीवर जगतात. प्रामाणिकपणे काम करतात. त्या स्त्रिया तिथे का आल्या असे तुम्हाला वाटते? तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही काम करून खा. पण दुसऱ्यांना अशा भाषेत शिव्या घालून काय मिळते?,’ असे अनेक प्रश्न विचारत तिने त्या युझरला सुनावले आहे. कलाकारांच्या काही गोष्टी आवडत नाहीत म्हणून त्यांच्यावर शिवीगाळ करणे हे चुकीचे आहे, असेही मानसीने म्हटले आहे. बुधवार पेठ हा पुण्यातील रेड-लाईट एरिया म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी महिला वेश्या व्यवसाय करतात.