बीड

बीडच्या शासकीय रुग्णालयाला तीन नवीन रुग्णवाहिका

एका रुग्णवाहिकेत कोंबले होते 22मृतदेह

27 april :- बीड जिल्हातील अंबोजोगाई कोरोनाचं हॉटस्पॉट ठरत आहे. अंबाजोगाईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही येथे जास्त आहे. त्यामुळेच प्रशासनही ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी होताना दिसत आहे. येथील स्वाराती रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. त्यातच रविवारी दुपारी 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी मृतदेह  रुग्णवाहिकेत कसे ठेवले असतील याचा अंदाज बांधलेलचा बरा. रुग्णालय प्रशासनाच्या या असंवेदनशील कारभारावर टीका होत आहे. काल उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपुर्ण बैठक होत स्वारातीला आणखी 3 अॅम्ब्युलन्स तात्काळ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर यापुढे अंत्यसंस्कार तात्काळ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले असून तशा सूचना उपविभागीय अधिकारी शरद झाळगे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.

स्वारातीकडे सध्या दोनच रुग्णवाहिका असल्याने त्या तुलनेने कमी असून ज्या रुग्णवाहिकेतून मृतदेहांची वाहतूक केली जाते त्याच रुग्णवाहिकेतून रुग्णांना ने-आन झाली असेल. सध्याची आपत्तीची परिस्थिती असल्यामुळे या गोष्टी होऊ शकतात. गेल्या वर्षी पाच रुग्णवाहिका होत्या, यावर्षी मात्र दोनच आहेत. असे डॉ. शिवाजी सुकरे यांनी सांगितल्यानंतर आणखी तीन रुग्णवाहिका स्वारातीला घेण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. काल याबाबत स्वारातीत प्रशासन आणि रुग्णालय प्रशासन यांच्यात बैठक झाली. यापुढे कोरोना बाधितांच्या मृत्यूनंतर तात्काळ अंत्यसंस्कार कर येणार आहे. दिवसभराचे मृतदेह जमा करून एकाच वेळी अंत्य करू नयेत, अशा सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्याचे उपविभागीय अधिकारी शरद झाळगे यांनी सांगितले.